जागतिक पर्यावरण दिनी अंशुल कंपनी व ग्रामपंचायत रोठ बुद्रुक यांचा स्तुत्य उपक्रम
रोहा (रविना मालुसरे) : दरवर्षी ५ जून ह्या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणीय समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे हा त्या मागील प्रमुख उद्देश असतो. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अंशुल कंपनीच्या वतीने रोठ बु. येथील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपनाचे महत्त्व विषद करताना,"पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावण्याचे आवाहन रोठ बु. ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन वारंगे यांनी केले.
या वेळी सरपंच नितीन वारंगे, उपसरपंच वेदीका डाके, ग्रामपंचायत सदस्य अमित घाग, सदस्या वैभवी भगत, ग्रामसेविका अलका बामगूडे, अंशुल कंपनीचे अधिकारी सातपुते साहेब, मॅनेजर शिट्यालकर साहेब, तावडे साहेब, राजमुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश डाके, श्रीपर्ण सहकारी संस्थेच्या चेअरमन श्रद्धा घाग, विलास डाके तसेच सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, सदस्या स्वप्नाली देवकर, मंगेश देवकर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. अंशुल कंपनीच्या या स्तुत्य उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे.

Comments
Post a Comment