🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

माहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती

नवी मुंबई, दि. 9 : सचिव तथा माहिती व जनसंपर्कचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज कोंकण विभागीय माहिती कार्यालयाला भेट दिली. तसेच कोकण विभागात होणाऱ्या मुसळधार पावसाचा आढावा घेतला. विभागीय कोकण आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडूनही माहिती घेतली.

कोकण विभागात दोन दिवसाआधी पावसाचे आगमन झाले आहे. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दि. 10 व 11 जूनला रायगड, पालघर व ठाणे जिल्हयात अतिवृष्टीचे संकेत हवामान खात्याने दिलेले आहे. आपातकालीन परिस्थितीची अचूक माहिती बातम्यांच्या स्वरुपात व इतर समाज माध्यमांव्दारे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम विभागीय माहिती कार्यालय व त्यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत चोखपणे पार पाडले जाते.  

संभाव्य अतिवृष्टीच्या काळात बातम्यांच्या प्रसिध्दी विषयक कामांचे नियोजन व कोकण विभागात होणाऱ्या पावसाचा आढावा घेण्यासाठी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी विभागीय माहिती कार्यालयास अचानक भेट दिली. 

यावेळी डॉ. पांढरपट्टे यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कोरोना काळात प्रसिध्दीच्या कामात खंड न पडू देता काम केल्या बद्दल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच येणाऱ्या काळातही कर्मचाऱ्यांकडून अश्याच कौतुकास्पद कामाची अपेक्षा व्यक्त केली. सोबतच कुटूंब प्रमुखाप्रमाणे पावसाळ्यात सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे अशा सुचनाही दिल्या. 

यावेळी कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी कोकण विभागाच्या कामकाजाचा अहवाल डॉ. पांढरपट्टे यांच्या समोर मांडला.

Comments

Popular posts from this blog