ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 79 मि.मी. पावसाची नोंद 

रायगड (किशोर केणी) : रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 79.38 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 223.56  मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. 

आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे : 

अलिबाग-80.00 मि.मी., पेण- 80.00 मि.मी., मुरुड-69.00 मि.मी., पनवेल-160.40 मि.मी., उरण-111.00 मि.मी., कर्जत- 79.50 मि.मी., खालापूर- 69.00 मि.मी., माणगाव- 39.00 मि.मी., रोहा-97.00 मि.मी., सुधागड-84.00 मि.मी., तळा-67.00 मि.मी., महाड-36.00 मि.मी., पोलादपूर-35.00 मि.मी, म्हसळा- 54.00 मि.मी., श्रीवर्धन- 87.00 मि.मी., माथेरान- 122.20 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 270.10 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 58.99 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 7.11 टक्के इतकी आहे.

Comments

Popular posts from this blog