मा. जयवंत दादा मुंडे वाढदिवस विशेष वृत्त
"वडिलांचे आशीर्वाद आणि तटकरे कुटुंबीयांची साथ हाच उज्ज्वल भविष्याचा राजमार्ग!"
- जयवंत दादा मुंडे
रोहा (रविना मालुसरे) : आपले वडील कै.जनार्दन मुंडे यांनी दिलेले आशीर्वाद व कोकणचे भाग्यविधाते माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब व तटकरे कुटुंबियांची साथ आपल्या उज्ज्वल भविष्याचा राजमार्ग असल्याने आपण दोन्ही ठायी नतमस्तक होतो, असे भावपूर्ण प्रतिपादन जयवंत दादा मुंडे यांनी केले. दिनांक १५ मे हा जयवंत दादांचा वाढदिवस. दरवर्षी शेकडोंच्या संख्येने त्यांचा मित्रपरिवार, किल्ला परिसरांतील नागरिकांची त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी होत असते. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
कै. जनार्दन मुंडे यांचा राजकीय प्रवास माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब व मा. भाईसाहेब पाशिलकर यांच्या सहकार्याने सुरू झाला. वडिलांचा ग्रामपंचायतीपासून रोहा पंचायत समिती पर्यंतचा प्रवास खुप रोमांचक होता. ते दहा वर्षे रोहा पंचायत समिती सदस्य, तर त्यातील पाच वर्ष उपसभापती पदावर विराजमान होते. वडिलांप्रमाणेच आई जयवंती जनार्दन मुंडे ह्यासुद्धा पंचायत समिती सदस्य होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी रोहा पंचायत समितीमार्फत पं.स.मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्याच जनसंपर्कातून व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण राजकारणाकडे ओढलो गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वडिलांनी जोडलेली माणसे व जपलेली नाती ही यापुढेही आपल्याला प्रेरणादायी ठरतील, असे त्यांना प्रांजळपणे वाटते.
समाजकारणाचे बाळकडू त्यांना वडिलांकडूनच मिळाले. धाटाव विभाग कुणबी समाजामध्ये त्यांनी सक्रिय काम केले आहे. शैक्षणिक कार्याची आवड असल्यामुळे रायगड जिल्हा परिषद शाळा किल्ला येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी काम केले. त्या पदावर असताना प्राथमिक शाळेमध्ये विविध योजना राबविल्या." करेल रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे!", या नात्याने मुलांमध्येच परमेश्वर बघून निरपेक्ष भावनेतून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काम केले.
ग्रुप ग्रामपंचायत किल्ला येथे ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कार्यास सुरुवात केली. तिथेच त्यांनी आपल्या कामातून जनतेवर छाप पाडली. यश-अपयशाचा विचार न करता पक्ष संघटना व जनहित लक्षात घेऊन काम करत राहणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय असल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होते. त्यांच्या याच निरागस स्वभावामुळे त्यांना अनेक माणसे जोडली गेली, विशेषतः तरुणाईमध्ये त्यांचे विशेष आकर्षण आहे. हीच बाब रोह्यातील चाणाक्ष राजकीय जाणकारांनी हेरून जयवंत दादा यांची शिफारस पक्ष संघटनेसाठी केली. माननीय खासदार सुनील तटकरे साहेब, पालकमंत्री आदिती तटकरे व माननीय आमदार अनिकेत तटकरे यांच्या आदेशाने जयवंतदादांची नेमणूक रोहा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी करण्यात आली. आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक पदाला योग्य न्याय द्यायचा त्यांचा स्वभाव असल्यामुळे माननीय अदितीताई व माननीय अनिकेत भाई यांच्या रोहा तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहून, तेथील येथील जबाबदारी ते स्वीकारतात. रोहा तालुक्यातील युवक संघटना मजबूत करण्यासाठी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी युवा शक्तीचा वापर कसा करता येईल याचा त्यांनी ध्यास घेतला आहे.
एकीकडे तरुणाईला घेऊन राजकीय संघटनशक्ती मजबूत करीत असतानाच दुसरीकडे पक्षातील जेष्ठ मान्यवरांचा मान राखून खेळीमेळीच्या वातावरणात काम करण्यात त्यांचा हातखंडा आहे. माननीय भाईसाहेब पाशिलकर, विनोदजी पाशिलकर, विजयराव मोरे, मधुकर पाटील, भगत साहेब, मगर साहेब इत्यादी अनेक ज्येष्ठ नेत्यांचे ते सतत मार्गदर्शन घेत असतात. त्याचप्रमाणे युवा कार्यकर्ते महेंद्र दादा पोटफोडे, राकेश शिंदे, अमित मोहिते, नरेश बामुगडे इत्यादींच्या सहकार्याने आपणांस काम करण्यासाठी उर्जा मिळते असा दृढविश्वास त्यांना आहे.
हे सारे पाहिले की मा. जयवंत दादा मुंडे हे वडिलांचे आशीर्वाद व तटकरे कुटुंबियांच्या सावलीत राहून आपल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होतील याची मनोमन खात्री पटते.
मा.जयवंतदादांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांची सर्व स्वप्ने सत्यात उतरोत ह्याच मनःपूर्वक शुभेच्छा!




Comments
Post a Comment