तळा तालुक्यातील मौजे रहाटाड येथील नवीन आरोग्य उपकेंद्रासाठी जागा हस्तांतरित
तळा (संजय रिकामे) : तळा तालुक्यातील मौजे रहाटाड येथील नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
या पार्श्वभूमीवर मौजे रहाटाड ता.तळा येथील गट नं.250 एकूण क्षेत्र 0.52.0 हे.आर.पैकी 0-05-0 हे.आर. ही जमीन, ग्रुप ग्रामपंचायत रहाटाड यांच्याकडून पुर्नग्रहण करण्यात येत असून उक्त महसूल मुक्त व सारामाफीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे नवीन आरोग्य उपकेंद्र रहाटाडसाठी, ता.तळा करिता पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.
तळा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.