🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

कर्नाळा येथील ६ वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता 

तळा (संजय रिकामे) : तळा तालुक्यातील कर्नाळा येथील ६ वर्षाचा कु. निलेश महादेव शिगवण रा. कर्नाळा दि.१५ मे २१ रोजी दुपारी ११ ते १ वाजण्याच्या दरम्यान बोरघर हद्दीतील नावरी नावाच्या जंगलातून मधल्या वाटेने आपल्या नातेवाईकांसोबत तळा ते कर्नाळा गावाकडे जात असताना अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. तळा पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कु. निलेश महादेव शिगवण हरवण्याच्या आधी त्याच्या सोबत त्याची आई व भाऊ होते.वाटेत आई  नैसर्गिक विधी साठी बाजूला गेली असता ही दोन मुले तिथे होती त्यानंतर कु.निलेश दिसून न आल्यानेआई व दुसऱ्या मुलाने शोधाशोध केली. बराच वेळ शोधूनही न सापडल्याने गावात गेल्यावर ग्रामस्थांना सांगीतल्यावर गाव परिसरात नातेवाईक, व संपूर्ण नदी, विहीरी शोधून काढल्या असता न मिळाल्याने तळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पथक आणि सामाजिक कार्यकर्ते निलेशचा शोध घेत आहेत सदर मुलगा अचानक गायब झाल्याने भिती व्यक्त केली जात आहे. या मुलाचे वडील विकलांग असून आईचे मानसिक स्वास्थ्य बरे नसून या चुणचुणीत हुशार मुलासाठी ग्रामस्थ मंडळ अहोरात्र मेहनत घेऊन तपास करीत आहेत. यासाठी खाजगी ड्रोन कँमेरा मागविण्यात आला असून युद्ध पातळीवर शोध सुरू आहे.सदर मुुलगा आढळून आल्यास ०२१४०-२६९०३३  या फोन नं वर संपर्क साधावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.तळा पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमा विरुद्ध भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांचे मार्गदर्शना खाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज खराडे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog