पत्रकार समीर बामुगडे यांच्या सासुबाई दुर्गा तुकाराम चिखलेकर यांचे निधन
रोहा (प्रतिनिधी) : पनवेल तालुक्यातील काळुंद्रे गावच्या दुर्गा तुकाराम चिखलेकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी दि. २१ मे २०२१ रोजी सकाळी तीन वाजता अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे समस्त चिखलेकर कुटुंबियांनर व गावावर शोककळा पसरली आहे.
दुर्गा तुकाराम चिखलेकर या आदर्श गृहणी होत्या. त्याच्या पश्चचात २ मुले, सुना, ५ मुली, ३ नातु, ४ नातवंडे असा परिवार आहे. कै. दुर्गा चिखलेकर ह्या रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पत्रकार समीर बामुगडे यांच्या सासूबाई आहेत. त्यांचे तेरावे २ जून रोजी त्यांच्या राहात्या घरी पार पडणार आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना त्यांचे कुटूंबीय, नातेवाईक व हितचिंतकांकडून करण्यात आली आहे.