🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

"ताउत्के" चक्रीवादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू

तळा (संजय रिकामे) : "ताउत्के" चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर  जाणवू लागला होता. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत होते.

यादरम्यान चक्रीवादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून मृत व्यक्तींची माहिती पुढीलप्रमाणे आहे. 

श्रीमती निता भालचंद्र नाईक, वय ५० वर्षे, त्या उरण तालुक्यातील रहिवासी असून त्यांचा मृत्यू सिमेंटचा ब्लॉक अंगावर पडल्याने झाला. 

श्रीमती सुनंदाबाई भिमनाथ घरत, वय ५५ वर्षे, ह्या उरण तालुक्यातील असून त्यांचा मृत्यू सिमेंटचा ब्लॉक अंगावर पडल्याने झाला. 

श्री.रामा बाळू कातकरी, वय ८० वर्षे, ते  पेण तालुक्यातील रहिवासी असून त्यांचा मृत्यू आंब्याची फांदी अंगावर पडून झाला. 

श्री.रमेश नारायण साबळे, वय ४६ वर्षे, धाकाव एमआयडीसी, रोहा (रा.डोंबिवली, ठाणे) येथील असून त्यांचा मृत्यू अंगावर झाड पडून झाला. या चारही मृत व्यक्तींची नोंद घेऊन जिल्हा प्रशासनाने पुढील आवश्‍यक ती कार्यवाही पूर्ण केली आहे.

Comments

Popular posts from this blog