सुर्योदय फाऊंडेशन आणि समाजसेवक कृष्णा महाडिक यांचे मनापासुन आभार

तळा (संजय रिकामे) : 'आभारी आहे', 'थ्यँक यु' हे आपल्या जीवनात नेहमी वापरले जाणारे शब्द अगदी घरातुन बाहेर जाताना रिक्षावाल्याने शंभर रुपये सुट्टे दिले तरी आपण त्याचे आभार मानतो, ट्रेनमधील मित्र, आॅफीसमधील मित्र रस्त्यावर जाता येता आपल्याला मदत करणारी व्यक्ती अशा सर्वांचे आपण आभार मानतो पण कोणीतरी आपल्या मार्गावर सतत सावली बनून आपल्याला हात देत जगण्याचा मार्ग सुकर आणि आनंददायी करत असते. अशा व्यक्तीचे आभार कीती जरी मानले तर ते कमीच पडतील.अशाच व्यक्तीचे रायगड जिल्हा विशेष करुन तळा तालुका आभार मानत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे रायगड भुषण  समाजसेवक कृष्णा महाडिक. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा कमी पडु नये म्हणुन रक्त दात्यांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यापासून रक्तदान शिबीर आयोजित करणे,  गरजवंतांना जीवनावश्यक वस्तु मिळवुन देण्यापासुन ते चक्रीवादळात अनेक काॅलेज शाळांची पडझड झाली काॅलेज शाळांची छप्पर उडाली  असताना सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात समाजसेवक कृष्णा महाडिक यांनी दिला आहे आज पुन्हा ते रायगड वासियांसाठी धावुन आले आहेत. 

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी प्रमाणात असले तरी सुरक्षितता म्हणुन प्राणवायूचा कमतरता होऊ नये यासाठी सुर्योदय फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा पद्मश्री डाॅ.अनुराधा पौडवाल यांच्या संस्थेमार्फत आणि समाजसेवक कृष्णा महाडिक यांच्या प्रयत्नातून माणगांव शासकीय रुग्णालय कोविड सेंटर- 2 ऑक्सिजन मशीन, श्रीवर्धन शासकीय रूग्णालय कोविड-2 ऑक्सिजन मशीन, लोणेरे शासकीय कोविड सेंन्टर - 2 ऑक्सिजन मशीन, तळा प्राथमिक आरोग्य केंद्र-1 ऑक्सिजन मशीन म्हसळा शासकीय ग्रामीण रुग्णालय -1 ऑक्सिजन मशीन यांना वाटप करण्याचे जाहीर करण्यात आले. त्या अनुुुषंगाने तळा येथील नगरसवक चंद्रकांत रोडे, समाजसेवक महेेंद्र कजबजे यांनी मुंबई घाटकोपर येथील सुर्योदय फाऊंडेशन कार्यालयास भेट देऊन तळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आॅक्सिजन मशीन ताब्यात घेऊन आज दि.12.5.21 रोजी तळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमोल बिरवडकर यांना सुपर्द केले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची घोसाळकर, नगरसेवक चंद्रकांत रोडे, महेंद्र कजबजे, श्रीराम काजबजे, मितेश मुळे, राकेश नांदगावकर, सौ.मुळे आदि मान्यवर उपस्थित होते. 

Popular posts from this blog