तळा तालुका पॅटर्नची चर्चा होत असतानाच आढळले दहा नवे रूग्ण!
तळा (संजय रिकामे) : तळा तालुक्यात 15 मे रोजी 10 नव्या रुग्णांची वाढ झाली असुन कोरोना बाधीतांची संख्या 285 वर गेली आहे यापैकी 251 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य स्थितीत 15 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत; तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवस तळा तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या शुन्य होती त्यामुळे तळा तालुका पॅटर्नची जोरदार चर्चा रंगली होती. परंतु दुसरयाच दिवशी तालुक्यात दहा कोरोना रुग्ण आढळल्याने धोका वाढला आहे. तळा तालुक्यात रुग्ण संख्या कमी असली तरी मृत्यूचे प्रमाण इतर तालुक्यांपेक्षा सर्वाधिक आहे त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
तळा तालुक्यामध्ये कोरोना चे इतर तालुक्यांपेक्षा अगदी कमी संख्या होती. त्यामुळे तालुका प्रगती पथावर राहील अशी आशा तालुकावासीयांसह प्रशासनाने केली होती. परंतु मे महिन्यापासून आकडा वाढू लागल्याने काळजी सर्वांची वाढली आहे. आज नव्याने बाधीत झालेल्या रुग्णांमध्ये तळा नगरपंचात हद्दीतील नागरिकांची संख्या जास्त आहे.
तळा शहरात मागील काही दिवसात रुग्ण संख्या कमी असली तरी सद्य परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि साखळी तोडण्यासाठी नगरपंचायत प्रशासन व व्यापारी वर्गाने इतर तालुक्यांप्रमाणे आठवडा भर कडकडीत बंद ठेवणे गरजेचे आहे, नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, तसेच नेहमी मास्क चा वापर करावा. प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करा. सुरक्षित रहा. आपल्या बरोबर इतरांची काळजी घ्या आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा. प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकां बरोबर व्यापारी वर्गाने देखील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पोलीस अधिकारी बाजारपेठेत फिरल्याशिवाय व्यापारी बंद करत नाहीत, कधी कधी बाजारपेठ 12 ते 1 वाजेपर्यंत सुरु असते याकडे गांभीर्याने प्रशासनाने पाहीले पाहीजे. नागरिकांनी स्वतः हून घेतलेली काळजी आणि प्रशासनाने काटेकोरपणे घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत असेल तरच तळा तालुका पॅटर्न इतर ठिकाणी राबवता येईल.