आवाहन करूनही नियमांची पायमल्ली, माणगांंवकर कोरोनाच्या संकटात!

माणगांव (उत्तम तांबे) : कोविडच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या शनिवार रविवार या दोन दिवसाच्या लॉक डाऊनला नागरिकांनी व दुकानदारांनी चांगले सहकार्य केले. मात्र सोमवारपासून माणगांव बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू होऊन अनेक ठिकाणी गर्दी दिसत होती. आपल्याला दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत आलेले नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसत होते .नागरिकांनी व दुकानदारांनी नियमांचे पालन करून शासन व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन माणगांव प्रभारी तहसीलदार बी. वाय. भाबड यांनी केले असतानाही माणगांव बाजारपेठेत नियमांची पायमल्ली होताना दिसत होती. 

अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी सोशल डिस्टन्स साठी दुकानाबाहेर वर्तुळ काढावीत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांनी व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करणे गरजेचे आहे. विनाकारण बाजारात फिरू नये. दुकानदारांनी व नागरिकांनी वेळेचे बंधन पाळावे .कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करा. हे आम्ही दररोज अनाऊंसद्वारे आवाहन करीत आहोत. सर्वांनी नियमांचे पालन केले तरच कोरोनाच्या संकटावर आपण मात करू शकतो असे आवाहन डी.वाय.एस.पी. माणगाव प्रविण पाटील यांनी केले आहे. मध्यंतरी नियमांचे व कायद्याचे उलंघण करणाऱ्यांवर कारवाई करून दुचाकी वाहने जप्त करण्यात आल्या होत्या. ह्या नागरीकांच्या हलगर्जीपणामुळे व नियमांच्या उल्लंघनामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 

या कोरोना महामारीची दुसरी लाट दोन महिन्यांपासून आली असून माणगांव तालुक्यात याचा प्रादुरभाव हळूहळू वाढू लागला आहे. माणगाव तालुक्यात ३८ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून माणगाव उपजिल्हारुग्णालयात ३२ रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यामधील चार रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. पाच रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले असुन अद्यापपर्यंत ७ रुग्ण कोरोना या महामारीमुळे मृत्यूमुखी पडले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे माणगांवकरांवर कोरोनाचे संकट निर्माण झालेले दिसत आहे. या कोरोनाला हरविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारने दिलेल्या नियमांचे पालन केले तर कोरोनाचे संकट दूर होण्यास मदत होईल. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांचे एक मताने सहकार्य अपेक्षित आहे. सर्व नागरीकांनी शासनाने सांगितलेल्या उपाययोजना आपल्या पातळीवर राबविण्याची गरज आहे, असे आवाहन करून माणगाव उपजिल्हा रुग्णालय आधिक्षक डॉ. इंगोले यांनी अपेक्षा व्यक्त केली .

Popular posts from this blog