रोहा तालुक्यात अज्ञानी वकील देतोय लोकप्रतिनिधींना निरर्थक सल्ले!
रोहा (प्रतिनिधी) : वकील म्हणजे कायद्याचे ज्ञान असणारी व्यक्ती! हे सर्वश्रुत आहे. परंतु काही वकील इतके बिनडोक व अज्ञानी असतात की त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. एक असाच अतिशहाण्या वकीलाचा बालिशपणा पाहिल्यानंतर याला वकील कोणी बनवले? असाच प्रश्न उपस्थित झालेला आहे!
एका ग्रामपंचायतीला एका मिडीयासोबत पत्रव्यवहार करायचा होता. परंतु तेव्हा या ग्रामपंचायचतीने एका "बिनडोक" वकीलाचा सल्ला घेण्याचा प्रयत्न केलाय. हा वकील इतका अज्ञानी आहे की, त्याने ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना लेटरपॅडचा वापर न करता व सही शिक्का न देता साध्या कागदावर ऑफीशियली पत्रव्यवहार करण्याचा सल्ला दिला. त्यावरूनच या वकीलाला अक्कलेचा भाग हा डोक्यात आहे की गुडघ्यात आहे, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. हा वकील पुढे काय दिवे लावणार? याला वकील म्हणावे की "कॉमेडी वकील" म्हणावे अशीच सर्वत्र चर्चा आहे! या वकीलाची डायलॉगबाजी पण भारीच आहे! कोर्टात खेचू का? नोटीस पाठवू का?
परंतु या कॉमेडी वकीलाच्या नोटीसला घाबरेल तरी कोण? हे त्यालाच कळत नाही!