🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले पन्हळगड संवर्धन मोहीम 

अनेक दुर्गवीर सक्रीयपणे सहभागी

माणगांव (प्रमोद जाधव) : मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले पन्हळगाडवर (पन्हळघर बुद्रुक) परिसर स्वच्छता व संवर्धन मोहीम नुकतीच संपन्न झाली. या मोहिमेत पाण्याच्या टाक्या व सभोवतालच्या जवळचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला गेला. तसेच गड माथ्यावरील संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठानच्या वतीने गेली अनेक वर्षे किल्ले पन्हाळगड संवर्धन मोहीम आयोजित केली जाते.

गड, किल्ल्यावरील  चिरे पुन्हा नव्याने रचण्याचा मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठान  प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. या मोहिमेत ६०/७० हून अधिक दुर्गवीर कार्यकर्ते  ़या मोहिमेत सहभागी झाले होते.

माणगांव तालुक्यातील ऐतिहािसीकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा हा किल्ला पन्हळगड हा माणगांव तालुक्याची ओळख आहे. या किल्यावर अनेक दुर्गप्रेमी श्रमदानातून गडाची नेहमीच निगा राखून गडाचे संवर्धन करीत असतात. 

मावळा स्वराज्य प्रतिष्ठानची समाजात ओळख झाली ती याच गडामुळे! या गडामुळे अनेक मान आम्हा दुर्गवीरांच्या मुलांना मिळाला आहे. याच पन्हळगडाची नियमित सेवा करणे आणि त्याची निगा राखणे आमचे कर्तव्य आहे. याच कर्तव्याचा भाग म्हणून ही पन्हळगडाची श्रमदान मोहीम आम्ही हाती घेत असतो असे मत प्रत्येक मावळा स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. मावळा स्वराज्य प्रतिष्ठानच्या या गडसंवर्धन मोहिमेस विविध प्रकारच्या मदतीसाठी व गड संवर्धन करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन मावळा स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तर पन्हळगाडच्या पायथ्याशी असलेल्या पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांनी  मावळा स्वराज्य प्रतिष्ठान दुर्गप्रेमींचे स्वागत करुन आभार मानले.

Comments

Popular posts from this blog