पाईपलाईनच्या कामात दिरंगाईच्या विरोधात नगरसेविका बसणार उपोषणाला! 

माणगांव (उत्तम तांबे) : प्रभाग क्र 6 मधील विद्यानगर येथे मागील 1 वर्षांपासून पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता. नगरसेविका सौ. हर्षदा सतीश सोंडकर-काळे यांनी पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून हा पाणीप्रश्न सुटावा याकरिता ऑक्टोबर 2020 पासून पाठपुरावा करून रुपये 2.5 लक्ष रुपयांची 3 इंच पाईपलाईन मंजूर केली. या कामाची निविदा मार्च 1 रोजी काढण्यात आली व या कामाचा ठेका मे. आर. एस. कन्स्ट्रक्शन्स कंपनीस मिळाला आहे. त्यासंदर्भात कार्यादेश दिनांक 7 एप्रिल रोजी देण्यात आला आहे. पाणीप्रश्न अत्यंत गंभीर व जीवनावश्यक असल्याने वारंवार विचारणा करून देखील मागील 21 दिवसांत काम सुरु झालेले नाही. त्यामुळे तेथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या महत्वपूर्ण पाणीप्रश्नामुळे तेथील नागरिकांचे हाल होत असल्याने नगरसेविका सौ. हर्षदा सतीश सोंडकर-काळे यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांची भेट घेऊन दिनांक 6 मे पर्यंत काम पूर्ण न झाल्यास प्रांताधिकारी तथा प्रशासक नगरपंचायत माणगांव यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार अशा माहितीचे पत्र मुख्याधिकारी यांना दिले आहे. 

Comments

Popular posts from this blog