www.news24taasmarathi.com पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... www.news24taasmarathi.com

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांचे पत्रकारांकडून स्वागत 

बोर्लीपंचतन (मुजफ्फर अलवारे) : दिघी सागरी पोलीस ठाणे बोर्लीपंचतन येथे नव्यानेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारणारे श्री. संदीप पोमण यांनी आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबाबदार पुढारी, व्यापारी, विविध समाज अध्यक्ष यांची मिटींग आयोजित करुन कायदा सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी लागणारे सर्वांचे सहकार्य व जबाबदारी याबाबत चर्चा केली व योग्य त्या सूचना देऊन नागरीकांना येणाऱ्या विविध समस्या यांबाबत माहिती करुन घेतली व सर्वांच्या सहकार्याने या विभागातील शांतता आबाधित ठेवण्यासाठी आपण कटिबध्द राहू असा विश्वास दिला. त्याचबरोबर या विभागातील स्थानिक पत्रकारांशी संवाद साधून त्यांना समाजामध्ये काम करीत असताना उद्भवणाऱ्या समस्या यांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगीतले की, "प्रसंगानुरुप तयार होणारे कायदे वा नियम हे आम्ही तयार केलेले नसतात तर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनतेसाठीच केलेले असतात. पोलीस प्रशासन केवळ त्याची अंमलबजावणी करतात. पोलीस आणि पत्रकार यांच्यात सुसंवाद असेल तर विविध समस्या सुटण्यास मदतच होईल त्याचबरोबर या परीसरातील कायदा सुवव्यस्था कायम चांगली राहण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असणार आहोत."
यावेळी श्रीवर्धन तालुका श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय कळस यांनी शाल व पुष्पगुच्छ देउन श्री. संदिप पोमण यांचा सत्कार केला व पत्रकार बांधवांकडुन आपणाला वेळोवेळी योग्य ते सहकार्य लाभेल असे आश्वासन देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, पोलीस नाईक संदिप चव्हाण पत्रकार दत्तात्रेय पांढरकामे,संतोष रेळेकर, श्रीकांत शेलार, गणेश प्रभाळे, मकरंद जाधव, वैभव तोडणकर, सुरेश पांढरकामे, मुज्जफर अलवारे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog