माणगांव सह्याद्री बझारच्या प्रथम लकी ड्रॉ मानकरी नीलिमा मुंडे  

माणगांव (उत्तम तांबे) : सह्याद्री प्राथमिक सहकारी ग्राहक संस्था माणगांव या सेवा भावी संस्थेने ग्राहकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून १ मार्च २०२१ पासून ५०० /- रूपयांच्या मालाच्या खरेदीवर लकी ड्रॉ धमाका आयोजित केला आहे. या सुरू असलेल्या लकी ड्रॉ मधील पहिल्या आठवड्याच्या प्रथम लकी ड्रॉ च्या पेण येथील नीलिमा मुंडे मानकरी ठरल्याने सह्याद्री बाजारचे मॅनेजर मोहन गोसावी यांनी जाहीर केले. यादरम्यान संस्थेचे चेअरमन संजय अण्णा साबळे यांनी दूरध्वनीवरून लाभार्थी विजेत्या ग्राहकाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. 

सह्याद्री बझार कडून खास ग्राहकांसाठी लकी ड्रॉ ऑफर प्रत्येक आठवड्यामध्ये एक असे महिन्याचे चार लकी ऑफर त्याकरिता सर्व ग्राहकाने आपली खरेदी सह्याद्री  बझार मध्येच करा. ५००/-  रुपयावर व त्यापुढे पटीने एक कुपन देण्यात येईल. त्याची सोडत उपस्थित ग्राहकांसमोर काढण्यात येईल. त्यामध्ये ज्या ग्राहकाचा लकी नंबर लागेल त्याला त्याने खरेदी केलेल्या रकमेएवढे सामान ताबडतोब दिले जाईल. खरेदी एका वेळेची एका बिलाची रक्कम विचारात घेतली जाईल. याची आमच्या ग्राहकांनी नोंद घ्यावी व आपली खरेदी आपल्या तीस वर्षाचा विश्वास निर्माण केलेल्या सह्याद्री बजार मध्येच करावी असे संस्थेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे आव्हान केले होते ८ मार्च २o२१ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा लकी ड्रॉ चे ओपनिंग सह्याद्री बझारचे विश्वासनीय ग्राहक सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या आठवड्या मधील एकूण ६४७ कुपन मधून कॅश मोमो नंबर -३९२३९ अशा नंबरचे व निलीमा मुंडे नावाचे कुपन लकी ठरले. यावेळी संस्थेचे संचालक मंडळ समवेत ग्राहक बहुसंख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog