🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

 माणगांव येथे विवा इंस्टिट्यूट ऑफ ऑफ हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्रात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 

माणगांव (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे प्रोफेशनल एज्युकेशन सोसायटीचे विवा इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्र कार्यरत असून येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

सन २०२०-२१ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रेसिपी बनविण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी कॉलेजचे प्रिन्सिपल विवेक ढेपे, रोहा इंस्टिट्यूटचे प्रोफेसर शुभम दिवेकर, तसेच माणगांव शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 

सामान्य माणसाला असामान्य मार्गदर्शन करणारे हे विवा इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्र असून कमी वयातच आर्थिक ध्येय्य देणाऱ्या अभ्यासक्रमाद्वारे येथे प्रशिक्षण दिले जाते. १००% नोकरीची हमी, राहण्याची मोफत सुविधा, डिजीटल सुसज्ज क्लासरूम, परदेशात जाण्यची सुवर्णसंधी, देश-परदेशात स्टार हॉटेलमध्ये व्यवस्थापन, आर्मी, नेव्ही, जहाज, विमानसेवा, रेल्वे विभाग, केंद्र व महाराष्ट्र शासनाचे हॉटेल्स, आयटी कंपनी यांमध्ये जॉब करण्याची सुवर्णसंधी, स्वतःचे हॉटेल, कॅटरिंग व्यवसाय सुरू करण्याबाबत येथे उत्तम मार्गदर्शन केले जाते.

Comments

Popular posts from this blog