🚨 रायगड पोलीस शिपाई भरती : १५ मार्चला अलिबागमध्ये लेखी परीक्षा... 🚨 रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमित; नागरिकांनी घाबरून जाऊ नये, साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलेंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर आवश्यक आहे – जिल्हाधिकारी किशन जावळे... 🚨

रोहा नगरपालिकेचा गलथान करभार? सौ. सनोबर गजगे यांच्यावर अन्याय!

रोहा प्रांताधिकारी यांच्याकडून चौकशीचे आदेश

रोहा (समीर बामुगडे) : रोहा येथील सनोबर सफदर गजगे यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत रोहा प्रांताधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

रोहा नगरपालिकेकडे सौ. सनोबर सफदर गजगे यांनी मालकीच्या मालमतेस कर प्रणाली असेसमेंटमध्ये त्यांच्या नावाची नोंद करण्यासाठी ५ फेब्रुवारी २०२० रोजी अर्ज केला होता. त्या अर्जास  एक वर्ष होऊन गेला आहे. या अर्जानिमित्त गेले वर्षभर रोहा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून वेळेवेळी त्यांना सहकार्य केले आहे. परंतु नगरपालिकेकडून सुनवाणी घेण्यासाठी वारंवार नोटीस काढण्यात आली आहे.;प्रत्येक वेळी काहीतरी थातुर मातुर निमित्त पुढे करायचे आणि वेळढकळुपणाचे कार्य करायचं आणि मला पूर्ण सूचना न देता सुनवाणी रद्द करायची. गेले वर्षभरात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून माझा अर्ज निकाली काढण्यासाठी कित्येक वेळेला लेखी तोंडी विनंत्या केल्या आहेत. परंतु माझ्या अर्जावर कोणताही निर्णय न देता तोंडी कोर्टात जाण्यास सांगितले व जाणीव पूर्वक अर्ज निकाली काढण्यासाठी टाळाटाळ केली जाते याच कारणामुळे मला खुप मानसिक त्रास झाला आहे असे रोहा येथील मुस्लिम अल्पसंख्याक समाजाची एक महिला सौ. सनोबर सफदर गजगे यांचे म्हणणे आहे.

रोहा नगरपालिकेच्या या प्रवृत्तीमुळे असे निदर्शनास येत आहे की नगर पालिका जाणूण बुजून काही स्वार्थहिताने या विषयाला पाठीशी घालत आहे. रोहा नगरपालिकेच्या अंदाधुंदी कारभाराच्या विरोधात २६ जानेवारी २०२१ रोजी सौ. सनोबर गजगे यांनी आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यानंतर नगराध्यक्षांनी याप्रकरणी योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे सदर उपोषणाला स्थगिती देण्यात आली. परंतु त्यानंतर आजपर्यंत नगरपरिषदेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, याप्रकरणी रोहा प्रांताधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी रोहा प्रांताधिकारी काय कारवाई करतील हे महत्वाचे ठरणार आहे.


Comments

Popular posts from this blog