🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

रोहा नगर परिषदेलगतच्या तलावात ४१ वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू

रोहा (रविना मालुसरे) : रोहा नगरपालिकेच्या नजिकच्या तलावात एका ४१ वर्षीय इसमाचा मृतदेह सापडल्याने रोह्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. सदर व्यक्ती ही धनगर आळीतील असल्याची खबर रोहा पोलीस ठाण्यात देण्यात आली.

काल धुलीवंदनाच्या सणाच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता धुळवड उत्सव साजरा झाल्यानंतर महेंद्र यशवंत सोनवटकर (४१), रा. रोहा ही व्यक्ती सायंकाळी सहा वाजल्यापासून घरात नसल्याची खबर रोहा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्याचा शोध घेत असताना आज सकाळी ३० मार्च रोजी रोहा नगर परिषद लगत असलेल्या तलावामध्ये त्याचा मृतदेह सापडला. यावेळी तेथे असलेली काही मुले व कामगार यांनी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून रोहा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. 

दरम्यान, उपजिल्हा रुग्णालय मध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र प्रकरण हाताबाहेर जाणार नाही याची काही नागरिकांनी काळजी घेत घेतली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मयुर दिवेकर, रवींद्र चाळके, राजेश काफरे व नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान या घटनेचा पुढील तपास  रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, ए.पि.आय शेगडे, कल्पेश कांबळे, कुथे, प्रनीत पाटील, सुनिल पाटील यांच्यासह सहकारी करत आहेत.

Comments

Popular posts from this blog