शिव वडापाव झुणका भाकर केंद्राचे अनिल नवगणे यांच्या हस्ते उद्घाटन
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांचे स्मारक बांधणार - डाॅ. मनोज पाथरे
तळा (संजय रिकामे) : शिववडापाव व झुणका भाकरी केंद्राचे उद्घघाटन शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या शुभहस्ते दि. १ मार्च रोजी १२.३० वा. करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, शहर प्रमुख राकेश वडके, उपनगराध्यक्षा सायली खातु, गटनेते अॅड. चेतन चव्हाण, जेष्ठ नगरसेवक विठोबा चांडीवकर डॉ. मनोज पाथरे, डॉ. कविता पाथरे, ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. चंद्रकांत विचारे, ज्येष्ठ पत्रकार किशोर पितळे, महिला शहर संघटक नम्रता पाडळकर, शिवसैनिक आणि तळेवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. मनोज पाथरे हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शिवसेना पक्षाच्या कार्यप्रणाली वर प्रभावित होऊन पक्ष प्रवेश केला. या पक्षाने तळावासियांसाठी जवळपास १० कोटींची वावे धरणातून पाणी योजना मंजूर करून आणली. हिंदु हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, माँ साहेब यांचे तळा तालुक्यात स्मृती स्मारक उभे करण्यासाठी भविष्यात मी प्रयत्नशील राहणार आहे ते लवकर कसे पूर्ण केले जाईल या दृष्टीने काम करणार आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.