🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

तळा बस स्थानकात ध्वनिक्षेपणाद्वारे गाडीची सूचना; मराठी पत्रकार संघाला यश 


तळा (संजय रिकामे) : 
तळा बस स्थानकात प्रवाशांना येणाऱ्या जाणाऱ्या एसटीची माहिती ध्वनी क्षेपणाद्वारे दिली जावीअशी मागणी तळा पत्रकार संघ व प्रवाशांकडून करण्यात येत होती. याची दखल वाहतूक नियंत्रक विलास धोत्रे यांनी घेऊन तात्काळ दुरुस्ती करून ध्वनीक्षेपण चालू केले आहे. बसस्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची माहिती मिळावी यासाठी प्रत्येक स्थानकात प्रवाशांना ध्वनीक्षेपणाद्वारे सूचना दिली जाते. मात्र तळा बस स्थानकातील सूचना देण्याचे मशीन गेली कित्येक वर्षांपासून धूळखात पडलेले होते. यामुळे प्रवाशांना स्थानकात कोणती गाडी येणार आहे अथवा स्थानकात उभी असलेली गाडी कोठे जाणार आहे याची काहीच कल्पना नसते.
स्थानकात वयोवृद्ध नागरिक देखील गाडीचा बोर्ड वाचता येत नसल्याने तासनतास बसून असतात. ध्वनीक्षेपण (माईक) द्वारे सूचना देण्यात येत नसल्याने आपली गाडी कधी येईल याची त्यांना काहीच माहिती नसते. काही वेळा पाणी बॉटल, एखादे खाद्य पदार्थ किंंवा एखादी जीवनावश्यक वस्तू आणण्यास गेलेल्या प्रवाश्याची थोडक्यासाठी गाडी सुटण्याच्या कित्येकदा घटना घडल्या आहेत. अशा वेळी दुसरी गाडी दोन ते तीन तासानंतर असल्याने जास्तीचे पैसे खर्च करून खाजगी वाहनाने या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचावे लागते. त्यामुळे तळा बसस्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची ध्वनिक्षेपणाद्वारे सूचना देण्यात सुरुवात झाली असल्याने जेणेकरून वयोवृद्ध प्रवाशांना तसेच स्थानकाच्या आजूबाजूला बाजार खरेदी करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना आपल्या गाडीची माहिती मिळू लागली आहे. त्यामुळे खाजगी वाहनाकडे, रिक्षा मिनीडोअर रिक्षांंकडे न जाता बसकडे वळून प्रवाशांना व महामंडळाला फायदा झाला आहे. प्रवाशी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र गाड्यांच्या वेळापत्रक बोर्ड गेले कित्येक महिने नाही. ते देखील बसविण्यात यावा. तसेच बदलणाऱ्या गाड्याचे टाईमिंगची नोंद सुचना बोर्ड वर करण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्ग व विद्यार्थी यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog