ब्रेकिंग न्यूज
🚨 पुणे पोलिसांचा बुधवार पेठेत मोठा दणका! अल्पवयीन मुलीची सुटका करत १५ बांगलादेशी नागरिकांना घेतले ताब्यात🚨

ढालघर फाटा येथील जुगार क्लब चालकांची गुंडगिरी, रोहा येथील पत्रकाराला दमदाटी करण्याचा प्रयत्न!

ढालघर फाटा येथील जुगार क्लब कायमस्वरूपी बंद होणे गरजेचे

ढालघर फाटा येथील जुगार क्लबमुळे पेलीसांचा खिसा झालाय गरम! 

रायगड (विशेष प्रतिनिधी) : माणगांव तालुक्यातील ढालघर फाटा येथे बेकायदा जुगार क्लब सुरू असून येथील जुगार क्लब चालकांनी गुंडगिरी सुरू केल्यामुळे येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील एका जुगार क्लब चालकाने रोहा येथील पत्रकाराला दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. यामुळे अनेक पत्रकार संघटना देखील पेटून उठल्या आहेत. प्रेस संपादक व पत्रकार संघाने देखील या धक्कादायक प्रकाराचा जाहिर निषेध केलेला असून आता अनेक पत्रकार या जुगार क्लब विरूद्ध आक्रमक झालेले आहेत.

या अवैध जुगार क्लबमुळे येथील स्थानिक पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. डया परिसरामध्ये या बेकायदा जुगार क्लबमुळे या परिसरातील महिला वर्गामध्ये संतापाची लाट पसरली असून महिला वर्ग मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.  सदरचा बेकायदा जुगार क्लब या परिसरात आजपर्यंत कायम सुरू असल्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यस्था आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गासमोर उभा आहे. 

या अवैध जुगार क्लबमुळे येथील स्थानिक पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. या परिसरामध्ये या बेकायदा जुगार क्लबमुळे या परिसरातील महिला वर्गामध्ये संतापाची लाट पसरली असून महिला वर्ग मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.  सदरचा बेकायदा जुगार क्लब या परिसरात आजपर्यंत कायम सुरू असल्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यस्था आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गासमोर उभा आहे.

Comments