ढालघर फाटा येथे जुगार क्लब जोमात, पोलीस कोमात! जुगारामुळे अनेक संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर!

जुगार क्लबवाले म्हणतात "पोलीस आमच्या खिशात!"

बेकायदा जुगार क्लब चालकांना पोलीस ठोकतात सलाम?

रायगड (प्रतिनिधी) : माणगांव तालुक्यातील ढालघर फाटा येथे जुगार क्लब पुन्हा राजरोसपणे सुरू झालेला असून या अवैध जुगार क्लबमुळे अनेक संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. पोलीसांनी या जुगार क्लबकडे पोलीसांनी दुर्लक्ष केलेले असून "जुगार क्लब जोमात आणि पोलीस कोमात" अशी परिस्थिती दिसून येत आहे. ढालघर फाटा येथील अवैध जुगार चालक ऐटीत सांगत असतात की, हा जुगार क्लब बंद होऊच शकत नाही. कारण... पोलीस आमच्या खिशात असून ते आम्हाला सलाम ठोकतात!

येथे कृषी केंद्राच्या वर दुसऱ्या मजल्यावर जुगाराचे केंद्र सुरू झाल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु पोलीस या जुगार क्लबविरूद्ध कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. तसेच या परिसरातील महिला व नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलीस प्रशासनाने हा अवैध जुगार क्लब तातडीने बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील महिला वर्गाकडून केली जात आहे. 

माणगांव तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या ढालघर फाटा येथील गॅरेजच्या पाठीमागील बाजूस कृषी केंद्राच्या वर दुसऱ्या मजल्यावर बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू झालेले आहे. या परिसरामध्ये या बेकायदा जुगार क्लबमुळे या परिसरातील महिला वर्गामध्ये संतापाची लाट पसरली असून महिला वर्ग मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.  सदरचा बेकायदा जुगार क्लब या परिसरात आजपर्यंत कायम सुरू असल्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यस्था आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गासमोर उभा आहे.

Popular posts from this blog