माणगांवमध्ये 'बर्निंग ट्रक' चा थरार!!
सतरंजी वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग

ही आग विझविण्यासाठी माणगाव नगर पंचायत कर्मचारी दशरथ गावडे, पोलीस स्वप्निल कदम यांनी स्वतः हजर राहून तसेच चेतक इंटरप्रायजेस, जे.एम. म्हात्रे इन्फ्रा., फ्री बर्ड मोर्बा, माधुरी वॉटर सप्लाय माणगांव यांनी पाण्याचे टँकर पाठवून आग आटोक्यात आणण्याचे काम केले. या घटनेची माहिती मिळताच माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, माणगांव नगराध्यक्षा योगिता चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे यांनी घटनास्थळी धाव घेतली
सदर लागलेली आग ही कशामुळे लागली हा चिंतेचा विषय आहे, मात्र घटनास्थळी ट्रक ज्या ठिकाणी जळत होता त्यासमोरून विद्युत वितरण कंपनीच्या फोर फेज लाईनचा झुला झाला आहे व त्या लाईनला ट्रकच्या हुडकरीता बांधण्यात आलेल्या रेगझिनचे तुकडे चिकटले आहेत त्यामुळे हा प्रकार घडला असावा व ट्रक मेन लाईनला स्पार्क होऊन उडालेल्या ठिणगीमुळे ट्रकने पेट घेतला असावा असे ट्रक चालकाचे म्हणणे आहे.
माणगांव ग्रामपंचायतची नगर पंचायत होऊन ५ वर्षे झाली. आता निवडणूक देखील तोंडावर आहे, फायर ब्रिगेडसाठी तरतूद देखील केली गेली आहे. मंजुरी देखील मिळाली तर मात्र माणगांवकर प्रतीक्षेत आहेत की आपल्या शहरात फायर ब्रिगेड दल केव्हा दाखल होते, अशा परिस्थितीत महाड किंवा रोहा नगर परिषदेकडून बंम्ब मागवला जातो मात्र पोहचायला 1 तास लागत असल्याने कुठल्याही प्रकारची घटना घडू शकते.