निजामपूरमध्ये बेकायदेशीर मटका!!
निजामपूरमध्ये पोलीस जिवंत आहेत की मेलेत? नागरिकांमध्ये संभ्रम!
माणगांव तालुक्यात इतरत्र कुठेही अवैध धंदे नाहीत, पण निजामपूरमध्ये 'जनतेचे रक्षक बनलेत भक्षक!'
निजामपूरमध्ये पोलीस बनलेत मटका माफियांच्या 'ताटाखालचे मांजर!'
रायगड (किशोर केणी) : कायदा, सुव्यवस्था आणि शांतता कायम टिकवून ठेवण्यामागे पोलीसांचे कार्य महत्वपूर्ण असते. परंतु एखाद्या ठिकाणी जर पोलीसच बेकायदेशीर कृत्यांना साथ देत असतील तर..??? हा 'कुंपणाने शेत खाण्याचा' प्रकार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र पोलीसांनी 'एक कार्यक्षम पोलीस दल' म्हणून लौकीक मिळविलेला आहे; परंतु रायगड जिल्ह्यातील काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्र पोलीस दलाची नाहक बदनामी होत चालली आहे.
विशेष म्हणजे माणगांव तालुक्यातील निजामपूर येथे कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कायद्याचे नॉलेज कमी आहे, काही ट्रॅफीक पोलीसांनी या पोलीस अधिकाऱ्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना 'अभ्यासू पोलीस अधिकारी' असे म्हणून याची स्तुती करून 'अतिशयोक्ती' केली होती. पण खरे पाहता अभ्यासूपणा व या पोलीस अधिकाऱ्याचा काडीमात्रही संबंध येत नाही. कारण हा पोलीस अधिकारी इतका 'बिनडोक' आहे की, याने एकदा काही पत्रकारांकडे यूट्यूब चॅनलचे (सोशल मिडीयाचे) लायसन्स मागितले होते. परंतु वस्तुस्थिती पाहता यूट्यूब चॅनलच्या लायसन्स संदर्भात भारत देशात कोणताही कायदा निघालेला नाही. यावरून हे सिद्ध झालेय की निजामपूर येथील पोलीस अधिकाऱ्याची अक्कल ही डोक्यात नसून गुडघ्यात आहे? परिणामी असा पोलीस अधिकारी पोलीस दलामध्ये काय दिवे लावणार? आणि जर प्रत्येक जिल्ह्यात असा पोलीस अधिकारी असेल तर पोलीस दलाविषयी सर्वसामान्य नागरिकांचे मत बदलून जाईल, यामध्ये शंकाच नाही! परिणामी असे पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस दलाला लागलेली एक 'कीड' आहे!
निजामपूरमध्ये बेकायदेशिररित्या राजरोसपणे मटका सुरू असून या मटकामाफियांना साथ देणाऱ्या व भ्रष्टाचाऱ्यांची दलाली करणाऱ्या येथील पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी व तातडीने निलंबीत करावे अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.
सर्वांसाठी महत्वाची सूचना
'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूज (मिडीया) हे भारत सरकारच्या माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या कक्षेत असून सुप्रिम कोर्टाने प्रसारमाध्यमांसाठी ज्या काही गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत, त्यांचे तंतोतंत पालन 'न्यूज २४ तास मराठी' तर्फे केले जाते.