क्रिकेट चे सामने भरवणे पडले महागात

भरडखोल येथील चौघांविरूद्ध दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बोर्लीपंचतन (मुझफ्फर अलवारे) : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशात सर्व पातळ्यांवर खबरदारी घेतली जात आहे. अशातच श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथेआयोजित क्रिकेटच्या सामन्यांत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्याने चौघांविरोधात दिघी सागरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिघी सागरी पोलीस ठाण्यात नवीन नियुक्ती झालेल्या सहा पोलीस निरीक्षक यांनी हा गुन्हा दाखल केला असून याबाबत संदीप चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मास इलेव्हन क्रिकेट मंडळाने भरडखोल येथे क्रिकेट चे सामने भरवले होते. यामध्ये शासनाने घालून दिलेला निर्देशाचे पालन न करता शंभर ते दीडशे जणांना एकत्र आणले. याद्वारे कोरोना रोगाचे प्रसार होण्याचा ठपका ठेऊन क्रिकेट मंडळाच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेतून नुकतीच नियुक्ती दिघी पोलीस ठाण्यात बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी नियुक्तीच्या दोनच दोनच दिवसांत हा गुन्हा दाखल करत आपल्या कामाची चुणूक दाखले आहे. याचा धसका स्थानिक पुढाऱ्यांनी घेतला आहे.
 विनापरवानगी क्रिकेटचे मॅचेस आयोजन करणे आणि कोणत्याही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्याने कलम 188, 269, 290, भादंवि 135 बीपी ऍक्ट तसेच साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 2, 3, 4 अन्वये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपस पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे करत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या  आदेशाने गुन्हा दाखल केला आहे. यापुढे देखील अशाच प्रकारे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- संदीप पोमन, सहा. पोलीस निरीक्षक, दिघी सागरी पोलीस ठाणे.

Popular posts from this blog