हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंती निमित्त शिलाई मशीन, घरगुती चक्की, फिल्टर व झेरॉक्स मशीन ५०% सवलतीमध्ये वाटप होणार!


माणगांव (उत्तम तांबे) :
हिंदुहृदयसम्राट, थोर महापुरुष शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंती निमित्ताने महाड, पोलादपूर, माणगाव मतदार संघ महाड यांच्या विद्यमाने शहरासाठी व तालुक्यासाठी शिलाई मशीन, घरगुती चक्की, वॉटर फिल्टर व एचपी ब्रँड झेरॉक्स मशीन ५०% सवलतीमध्ये वाटप करण्यासाठी अशोकदादा साबळे विद्यालय माणगांव व माणगांव जुनियर कॉलेज माणगांव येथील पटांगणामध्ये नियोजन करण्यात आले आहे. ८७००/- रूपयांची असलेली शिलाई मशीन ५५००/ -, १८९००/- किंमतीची असलेले घरगुती चक्की ९५००/- मध्ये, १०९९९/- किंमतीचे असलेले वॉटर फिल्टर ४९९९/- रू.मध्ये, तर ५७५००/- रू. किंमतीची असलेली एचपी ब्रँड झेरॉक्स मशीन बत्तीस हजार किमतीमध्ये म्हणजेच ५० टक्के सवलतीच्या दरात ग्राहकाला, लाभार्थीकाला देण्यात येणार आहे. 

या विविध वस्तूंपैकी एका कुटूंबाला एकच वस्तूचा लाभ घेता येईल. तसेच वस्तू बुकिंग करण्यासाठी येताना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन येणे बंधनकारक राहील. या नियोजित सवलतीचा माणगांवकर नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे महाड - पोलादपूर - माणगाव मतदार संघाकडू आवाहन करण्यात आले आहे.

Popular posts from this blog