🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन


तळा (संजय रिकामे) :
शिवसेनेचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील यांनी रायगड जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा योजना आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा नियोजन भवन अलिबाग येथे आज दि.१२ फेब्रुवारी रोजी केले होते. यावेळी अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या निवासस्थानी तळा तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ यांनी ना. पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान तळा तालुक्यातील विविध पाणी पुरवठा योजना नव्याने मंजुरीसाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना. पाटील यांना निवेदन दिले. दुर्गम भागात वसलेल्या  पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचे आश्वासन यावेळी पाणीपुरवठा मंत्री महोदयांनी दिले. तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ यांनी तमाम शिवसैनिकांच्या वतीने त्यांचे मनापासुन आभार मानले. यावेळी अलिबागचे आ. महेंद्रशेठ दळवी, कर्जत-खालापुरचे आ. महेंद्रशेठ थोरवे, उपतालुका प्रमुख शरद सारगे, अशोक राणे आदि मान्यवर उपस्थित होते.

पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असताना पाण्याच्या प्रश्नाकडे राजकारण म्हणून पाहीले जात आहे ही बाबा दुर्दैवी आहे. तळा नगरपंचायतीतील नव्याने मंजुर झालेली ९ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना केवळ शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच मंजुर झाली आहे. तळा शहरात दोन कोटी त्रेपन्न लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भुमीपुजन आणि उदघाटन नुकतेच पार पडले त्याच बरोबर तळा शहरातील नव्याने मंजुर झालेली ९ कोटी रुपयांची पाणी योजना यामुळे विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली असून ते खोटे श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे तळा तालुका शिवसेना प्रमुख प्रदुम्न ठसाळ यांनी सांगितले. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर मंजुर करण्याचे आश्वासन यावेळी दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Comments

Popular posts from this blog