शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी येत्या अधिवेशनात लढा देऊ - भरतशेठ गोगावले


माणगांव (उत्तम तांबे) :
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथ. विभाग म्हणजे एक परिवार आहे. तुमच्या संस्थेचे संघटन व एकता पाहून मी धन्य झालो. सन २०१० मध्ये या संस्थेची स्थापना करून आपण या संस्थेमार्फत शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक असे विविध उपक्रम राबवून भरीव कामगिरी केले आहे. आज या मेळाव्याच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होत आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आपली मागणी रास्त आहे शाळेचे लाईट बिल असेल, शिक्षक सेवकांचे वाढीव मानधन असेल अशा विविध प्रश्नांची मला जाणीव आहे. तेव्हा येत्या अर्थसंकल्प अधिवेशनात शिक्षक बांधवांना न्याय हक्क मिळण्यासाठी लढा देऊन मागण्या पूर्ण करू, असे महाड-पोलादपूर-माणगांव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथ. माणगांव विभाग शाखेने नियोजित केलेल्या सस्नेह मेळावा हळदी कुंकू कार्यक्रमात खात्रीदायक आश्वासन दिले. तसेच त्यांनी "तुमचे सौभाग्याचे कुंकू अबाधित राहो!" असे बोलून महिला शिक्षिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच म.रा.शि.प. प्राथ. विभाग राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, डॉ. सुनिता चांदोरकर, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती माणगाव, उपसभापती पंचायत समिती माणगाव, महेंद्र तेलगूरे या मान्यवरांनीही महत्वपूर्ण मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या मधुर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म. रा. शि. प. प्राथ. विभाग जिल्हाध्यक्ष संजय निजापकर यांनी भूषविले होते.


या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माणगांव पंचायत समिती सभापती अलकाताई जाधव, माजी सभापती राजेश पानवकर, पंचायत समिती सदस्य सुजित शिंदे, माणगांव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संगीताताई भक्कम, पत्रकार ॲड. सायली दळवी, डॉ. तुषार शेठ, माणगांव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाबुशेठ खानविलकर, शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह विजय पवार, माणगांव तालुका शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष सुहास चांदुरकर, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश म्हात्रे, स्वाभिमानी शिक्षक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष गोपी, जयदास घरात, उमेश विचारे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष कळंबे सर, श्री. नागोठकर, श्री. खाडे, महाड तालुका शिक्षक परिषदेचे अध्यक्ष मांढरे बुवा, संजय कोंडविलकर, सचिन खोपडे, बालाजी घुमरे, समीर खोडवे, बाळासाहेब बरगचे, रवी पाटील, शिक्षक परिषदेचे नितीन गरजे, अशोक शहाणे, रोहा शिक्षक परिषदेचे उमेश महाडेश्वर, अनिल नागरगोजे, रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी अलिबागचे चेअरमन सुशील वाघमारे, कोकण विभागीय प्रतिनिधी संदीप शिंदे, राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण पालवे, केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप निजापकर, पत्रकार कमलाकर ओव्हाळ, संतोष सुतार, सलीम शेख, सुनंदा जाधव, रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख दीप्ती गावंड, स्मिता नवघरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. 

सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली या समयी पहेल शाळेच्या विद्यार्थ्यांनी संदीप साळवे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत गीत सादर केले. तळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सचिन कांबळे यांनी शिवचरित्र संदर्भीय पोवाडा सादर केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणगांव तालुक्याचे अध्यक्ष गणेश जपकर यांनी केले होते. माणगाव तालुक्यातील सेवा निवृत्त झालेल्या केंद्रप्रमुख पदोन्नती मुख्याध्यापक उपशिक्षक यांचा सेवापुर्ती सत्कार शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आला तसेच ज्या शिक्षकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात गोड गौरव संपन्न केला आहे त्या सर्व शिक्षकांचा तसेच राष्ट्रहित, शिक्षण हित, विद्यार्थी हित, शिक्षक आहेत या उक्तीप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन केले आहे अशा विद्यार्थ्यांचाही शिक्षक परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटोळे, सूर्यभान शिरसाट यांनी केले तर सुधाकर करकरे यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले. सदर नियोजित कार्यक्रमाला माणगाव तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनींची बहुसंख्येने उपस्थिती लाभली होती.


Popular posts from this blog