माणगांव येथे ट्रॅक्टर व स्कूल बस मध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

माणगांव (उत्तम तांबे) : माणगांव शहरातील निजामपूर रोडवर गिरीश वडके यांच्या स्टिलच्या दुकानाजवळ टेम्पों नाका या ठिकाणी आज दि. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९ .३० च्या सुमारास माणगांव नगरपंचायतीचा कचरा वाहतूक ट्रॅक्टर व स्कूल बस यांमध्ये भीषण अपघाात झाला. या भीषण अपघातामध्ये दोन कामगार जबरदस्त जखमी होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. 

माणगांवहून पुण्याकडे जाणाऱ्या या निजामपूर रोडवर दररोज वाहनांची व नागरीकांची वर्दळ असते. त्यातच या अरूंद रस्त्यावर रिक्षा व टेम्पो, दुचाकी वाहने उभ्या केलेल्या असतात. त्यांमुळे या मार्गावर सतत छोटे-मोठे अपघात होत असतात. आज बुधवार दि. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९ .३० वाजण्याच्या सुमारास  याच निजामपूर रोडवर गिरीश वडके यांच्या स्टीलच्या दुकानाजवळ माणगांव नगरपंचायतीचा कचरा वाहतूक ट्रॅक्टर क्र. एम एच ११ जी २७९६ मध्ये नगरपंचायतीचे कामगार कचरा गोळाकरत मिजामपूर रोडने माणगांवकडे येत असताना स्कूल बस क्र. एमएच ०६ एस ७६०२ ह्या स्कूल बस वरिल ड्रायव्हर आरोपी नझीर इब्राहिम गालसूलकर याने निजामपूर रोडने माणगांवकडे येत असताना आपल्या ताब्यातील स्कूलबस भरधाव वेगाने चालवून या कचरावाहक ट्रॅक्टरला पाठीमागून जोरात धडक देऊन अपघात केला. या भीषण अपघातामध्ये नगरपंचायतीचे कामगार महेश दत्तू सकपाळ (वय १९), जयेश नंदकुमार जाधव (वय २४) अनिल नारायण सुर्वे (वय ५२) हे ट्रॅक्टरमधून बाहेर पडून जखमी झाले. या अपघातामधील मेहश दत्तू सकपाळ यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या आपघाताची माणगाव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. रजि. नं. १८४ अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, माणगांव पोलीस निरीक्षक देशमुख यांनी अपघात स्थळाची तत्परतेने पाहणी केली. तपास अधिकारी स.पो.नी. श्री. कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ओमले यांनी गुन्हा नोंद केला आहे.

Popular posts from this blog