🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

जिल्हा परिषद वरसे गट, पंचायत समिती काकडशेत गणाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर

निवडणुकीसाठी भाजपा सज्ज, महाविकास आघाडीची कसोटी

तळा (संजय रिकामे) : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्र. 41 वरसे व तळा तालुक्यातील पंचायत समिती 86 काकडशेत या निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी प्रसिध्दीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जाहीर केला असून तो पुढीलप्रमाणे आहे. मतदारयादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 15 जानेवारी 2021, राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुकीकरिता तयार केलेली मतदार यादी हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिध्दी करण्याचा दिनांक 18 फेब्रुवारी 2021, मतदारयादी संदर्भात हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक 26 फेब्रुवारी 2021, निवडणूक विभाग/निर्वाचक गणाच्या छापील मतदारयाद्या अधिनियमाच्या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्याचा दिनांक 05 मार्च 2021, निवडणूक विभाग/निर्वाचक गणाच्या छापील मतदारयाद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, याबाबतची सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 05 मार्च 2021, मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिध्दी करणे दिनांक 10 मार्च 2021. 

रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्र. 41 वरसे मधून अदितीताई तटकरे या राजिपमध्ये निवडून गेल्या होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्या श्रीवर्धन मतदार संघातून विधानसभेवर भरघोस मतांनी निवडून गेल्यानंतर वरसे जिल्हा परिषद गट रिक्त झाले होते. रायगड जिल्हा भाजपा युवक अध्यक्ष अमित घाग याांच्या सौभाग्यवती सौ. श्रध्दा घाग यांनी अदितीताई तटकरे यांच्या विरुद्ध निवडणुक लढवली होती. त्याचप्रमाणे तळा पंचायत समिती काकडशेत या गणाचे सदस्य व माजी सभापती रवींद्रशेठ नटे हे पंचायत समितीतील बैठकांना गैरहजर राहिल्याने त्यांचे सदस्यत्व विभागीय आयुक्तांनी रद्द केले होते. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.

रायगड जिल्हात भाजपाने तीन आमदारांच्या मदतीने स्थानिक पातळीवर हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारुन ही बाब सिध्द केली आहे. यामुळे आगामी पोटनिवडणुकीत भाजपा जोमाने उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रायगड जिल्ह्यात भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आटोकाट प्रयत्न केला तरिही भाजपाने प्रभाव दाखवलाच एकेकाळी रायगडमध्ये अस्तित्व नसलेल्या या पक्षाचे स्थानिक पातळीवर हे मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे. विशेष करुन राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली आहे. 

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी कार्यकर्त्यांचे अंतर्गत पक्ष प्रवेश बंद करावेत अशा सुचना महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. मागील एक वर्षात असे जाहीर पक्ष प्रवेश झालेले नाहीत. परंतु भाजपाने अंतर्गत कच्चे दुवे शोधत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना गळाला लावत घुसखोरी  सुरु केलेली  महाविकास आघाडीचे घटक पक्ष रोखु शकलेले नाहीत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास वरसे जिल्हा परिषद गट आणि काकडशेत पंचायत समिती गण पोटनिवडणुकीत भाजप वरचढ झालेला दिसून येईल.

Comments

Popular posts from this blog