ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

माणगांवध्ये स्वराज्य सह्याद्री ग्रुपतर्फे शिवजयंती साजरी


माणगांव (सचिन पवार) : माणगांव तालुक्यात स्वराज्य सह्याद्री ग्रुपतर्फे शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. या संस्थेने शिवज्योत पेटवून किल्ले रायगड महाड शिवाजी चौक ते माणगांव अशी शिवज्योत मिरवणूक काढली. या वेळेस माणगांव तालुका व्यापारी असोसिएशनचे अद्यक्ष श्री. बाळाशेठ दळवी, मुकेश जैन, गिरीश वडके, अशोक धारिया, सौ. सुषमा बाळा दळवी, तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व सदस्यांनी शिवज्योतीचे स्वागत केले. 

याप्रसंगी स्वराज्य सह्याद्री ग्रुपचे अद्यक्ष श्री. सचिन पवार, राजू सुतार, अनिकेत कांबळे, युवराज शिंदे, वासुदेव गुगळे व सर्व शिवमावळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने व अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शिवजयंती साजरी केली. प्रत्येकाच्या घरा घरात शिवजयंती साजरी होवी हीच आमची इच्छा असे स्वराज्य सह्याद्री ग्रुपच्या शिवमावळ्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog