वावे धरणातून तळा शहराला मिळणार 135 दशलक्ष लिटर पाणी - पालकमंत्री आदिती तटकरे
या नगरपंचायतीला दैनंदिन सुमारे 135 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नगरपंचायतीमार्फत मुख्य अभियंता, कोकण विभाग यांना देण्यात आलेला आहे. तळा नगरपंचायती नजीकच्या 3 कि.मी. अंतरावर असलेल्या वावे धरणातील पाण्याचा वापर करुन तळा शहरातील जनतेला पिण्यासाठी हा पाणीपुरवठा होऊ शकेल. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील वावे धरणातील 135 दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्यासाठीच्या आरक्षणाबाबत पालकमंत्री कु. आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांना विनंती केली आहे.