वडाची वाडी फाट्याजवळ गतिरोधक होण्याची ग्रामस्थांची मागणी 

सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दयावे 

माणगांव (राजन पाटील) : सद्य स्थितीमध्ये दिघी-पुणे हायवेचे माणगांव पासूनचे काम जोरात चालू असल्याने म्हसळा-श्रीवर्धनकडे जाणारे प्रवासी तसेच गोरेगावहून म्हसळा-श्रीवर्धन कडे जाणारे प्रवासी सद्यस्थितीमध्ये कुमशेत घाटातील मांजरवणे मार्गे दुचाकी, चार चाकी व मालवाहू वाहने सुसाट वेगाने ये-जा करीत असतात. अशा वेळी याच मार्गावर असणाऱ्या वडाची वाडी गावात जाणाऱ्या फाट्याजवळ सततची शेतकरी, कामकरी, शाळेचे विद्यार्थी, त्याचबरोबर याच फाट्याजवळ असणाऱ्या श्री. समर्थ वडापाव स्टॉलवरील गर्दी पाहता या रस्त्यावर अपघात होऊ नये याकरिता वडाची वाडी या ग्रामस्थांकडून या वडाची वाडी फाट्याजवळ मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने ही मागणी पूर्ण करण्यासाठी लक्ष द्यावे अशी विनंती करण्यात येत आहे. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे.

Popular posts from this blog