माणगांव तालुका आगरी समाजाची सभा संपन्न 

माणगांव (राजन पाटील) : संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत: कोकण किनाऱ्यावर ऊन, वारा, पाऊस यांना समर्थपणे तोंड देत आपल्या कष्टाने, जिद्दीने स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून अनेक नेतृत्वातून अखिल महाराष्ट्राला नवी दिशा देणारा, नवीन उंचीवर नेऊन ठेवणारा आगरी समाज सर्वांनाच परिचीत आहे. मैत्री, वचन जीवापाड जपणारा अनेक दु:खद, सुखद प्रसंगात शेवटपर्यंत साथ देणारा... अशीही आगरी समाजाची वेगळी ओळख आहे! 

माणगांव विभाग आगरी समाज शैक्षणिक व सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, हळदीकुंकू अशा स्वरूपाचे अनेक कार्यक्रम साजरे करीत असतात. अशा विविधांगी उपक्रमांतून नावारूपाला आलेल्या माणगांव तालुका आगरी समाजाची सभा श्री. अशोक म्हात्रे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी मागील सभेचे इतिवृत्त व मागोवा सचिव गजानन पाटील यांनी घेतला अध्यक्ष श्री. संजय पाटील यांनी सर्व समाज सभासदांचे स्वागत केले. 

यावेळी या समाजातील श्री. सिद्धार्थ म्हात्रे यांची माध्यमिक विद्यालय माणगांव या हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जूनी पेन्शन हक्क संघटना माणगांव तालुक्याच्या अध्यक्षपदी श्री. राजन पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही समाजाकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

ज्या साखळीच्या माध्यमातून समाज जोडते, एकमेकांना मदतीचा हात देणारी भिशी व महिलांचा हळदीकुंकू याबद्दलचे नियोजन करण्यात आले. यावेळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सल्लागार ज्ञानेश्वर म्हात्रे, श्री. राजाराम जांभळे, अशोक म्हात्रे, खजिनदार राजेश घरत, उपाध्यक्ष सौ. मेघना भगत, राजेंद्र भगत, शिवाजी म्हात्रे, हनुमान म्हात्रे, विद्याधर जोशी, संजय भोईर, नरेश म्हात्रे, शशिकांत म्हात्रे, सुजाता म्हात्रे, विद्या पाटील, माधवी म्हात्रे, राजेश्री पाटील, अरूणा म्हात्रे, स्मिता भोईर, मिनाक्षी म्हात्रे, निशा जांभळे, कल्पना घरत, भारती म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. 

आगरी समाज नेतृत्व, मैत्री, आधार व मदत या सर्वांची नेहमीच जपणूक करून सकारात्मक न्याय देतो. समाजाने केलेला सत्कार कायम मनात राहील, मी समाजाच्या नेहमी ऋणात राहीन, असे मत श्री. राजन पाटील सर यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog