माणगांवमध्ये तरूणीवर बलात्कार, नराधम शिक्षकाला अटक!

माणगांव (उत्तम तांबे) : पेण शहरातील बलत्काराची घटना ताजी असतानाच अशीच माणगाव शहरात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.  माणगांव शहरातील दत्तनगर येथील शिक्षक कॉलनीमध्ये राहणारा प्राथमिक शिक्षक मदन प्रल्हाद वानखेडे याने ५ जानेवारी २०२१ रोजी रात्री १० वा. सुमारास तेथील तरूणीवर बलात्कार केला. या माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेविरूद्ध माणगावकरांनी या नराधम शिक्षकाचा संतापजनक निषेध व्यक्त केला आहे. 

माणगांव तालुक्यातील रा.जि.प. शाळा वढगाव या शाळेवर मदन प्रल्हाद वानखेडे हा शिक्षक आहे.गलीच्छ वर्तणूणीचे शिक्षक म्हणून ते कुप्रसिद्ध आहेत. या त्यांच्या निच प्रवृत्तीमुळे शिक्षक कॉलनीमध्ये राहणाऱ्या या २२ वर्षीय तरुणीला धमक्या देऊन तिच्या इच्छेविरुद्ध मदन वानखेडे याने वारंवार शारिरीक अत्याचार केला आहे. 

तूझ्या आईची नोकरी घालविन, परिक्षेत तूला नापास करीन, अनैतिक समंधातून सोबत काढलेले फोटो दाखऊन ते सर्वत्र प्रसारीत करीन, अशी धमकी देऊन ते वारंवार फिर्यादीसोबत तिच्या ईच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केला. तसेच त्या तरुणीच्या मित्र-मैत्रणींना मेसेज पाठवून तीची बदनामी केली. तसेच त्याने इंस्टाग्रामवर तिच्या नावाचे बनावट अकाऊंट बनऊन त्यावरून तिच्या मित्र मैत्रणींना बदनामीकारक मेसेज पाठविले आहेत. या बदनामी व अमानुष घटनेविरूद्ध माणगांव पोलीसांनी धडक कारवाई करून वानखेडे याच्याविरूद्ध कॉ. गु. रजि. नं. ३/२०२१ भा.दं.वि. कलम ३७६ (२) (एन), ५००, ५०६  बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ४ व माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० (६६)  (सी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. बी. जाधव हे अधिक तपास करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog