www.news24taasmarathi.com पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... www.news24taasmarathi.com

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा 

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दि.१४ जानेवारी ते २८ जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा प्राचार्य डाॅ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेऊन राबविण्यात आला व मराठी भाषेविषयी, साहित्याविषयी जागृती करण्यात आली. या पंधरवड्यात उस्मानाबाद येथील सुप्रसिध्द कवी माधव गरड यांच्या अध्यक्षतेखाली दि. २२जानेवारी रोजी आंतरमहाविद्यालयीन कवी संमेलन आयोजित केले होते. यामध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, तेरणा महाविद्यालय, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, व्ही. जे. शिंदे महिला महाविद्यालयातील २० नवोदित विद्यार्थी कवींनी भाग घेतला होता. सहभागी कवींना प्रमाणपत्र देण्यात आली. २३जानेवारी रोजी "मी कसा घडलो" या विषयावर प्रा. डाॅ. उकिरडे (तेरणा महाविद्यालय) यांचे व्याख्यान संपन्न झाले. तर २५ जानेवारी रोजी प्रा. आविनाश ताटे (व्ही. जे. शिंदे महिला महाविद्यालय, उस्मानाबाद) यांचे कथाकथन संपन्न झाले. 

आज दि. २८ जानेवारी रोजी "मराठी भाषा पंधरवडा समारोप"प्रसंगी उस्मानाबाद जिल्ह्यातील साहित्यिकांच्या पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचे उद्घाटन प्राचार्य डाॅ. ए. बी. इंदलकर यांनी केले. यावेळी प्रा. डाॅ. देविदास इंगळे, उपप्राचार्य बबन सूर्यवंशी, डाॅ. केशव क्षीरसागर, प्रा. माधव उगीले, प्रा. निल नागभिडे, प्रा. डाॅ. जीवन पवार, प्रा. संजय शेंडगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डाॅ. शिवाजी गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक डाॅ. अरविंद हंगरगेकर यांनी केले. आभार प्रा. राजा जगताप यांनी मानले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली व पुस्तकांचा परिचय करून घेतला.

Comments

Popular posts from this blog