'शिक्षण माझा वसा' हा राज्यस्तरीय पुरस्कार अजित शेडगे यांना जाहिर
पुणे येथे १७ जानेवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान
माणगांव (राजन पाटील) : शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विविध अध्ययन अनुभव, शाळा व संस्था पातळीवरील विविध उपक्रम एकमेकांना संक्रमित करणे, शिक्षणासह सामाजिक उपक्रमांची देवाण-घेवाण करणे, विद्यार्थ्यांना आदर्श प्रिय, प्रेरणादायी ठरणारे लेखन अशी विविध सदरं ज्या 'शिक्षण विवेक' या अंकातून प्रसिद्ध होत असतात. या शिक्षण विवेक अंकातून शैक्षणिक व सामाजिक प्रबोधन करणारे माध्यमिक विद्यामंदीर रातवड, ता. माणगाव, जि.रायगड यांना 'शिक्षण माझा वसा' हा शिक्षण विवेक व टी.बी. लुल्ला चॉरिटेबल फाऊंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर झाला आहे. श्री. शेडगे सरांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तथा छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे सदस्य श्री. महादेव सखाराम जाधव, तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांचे पंचक्रोशी, संघ परिवार यांच्याकडूनही अभिनंदन होत आहे. आपल्या या पुरस्कार मिळण्याच्या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक म .स. जाधव सर व सर्व सहकारी बंधू-भगिनींची प्रेरणा आहे असे ते स्वाभिमानाने सांगतात.