मुंगीज परिसरात खैर तस्करांचा धुमाकूळ! 

खैर तस्करांकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लाखो रूपयांचा हफ्ता? 

रत्नागिरी (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील वाकवली व मुंगीज परिसरात खैर तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादामुळेच येथे बेकायदा खैर लाकडाची तस्करी होत असल्याचे दिसत आहे. 

येथील मुंगीज परिसरातून मोठ्या प्रमाणात बेकायदा खैर वाहतूक करणाऱ्या गाड्या भरून जात असून येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोच होत असल्याने या परिसरात बैकायदा खैर तस्करी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे बोलले जात आहे. येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे खैर तस्करांशी साटेलोटे असल्यामुळे येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांची सध्या जोरदार कमाई सुरू असल्याचे दिसत आहे. 

विशेष म्हणजे येथील खैर तस्करांच्या डोक्यावर वनविभागाचा आशिर्वाद असल्याने एखाद्या खैर तस्कराविरूद्ध एखाद्या तक्रारदाराने तक्रार केल्यास खैरतस्करांना वाचविण्यात येथील वनविभागाचे अधिकारी पटाईत असल्याचेही दिसून आलेले आहे. परिणामी शासनाची नोकरी करून खैर तस्करांची दलाली करणाऱ्या येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांवरच प्रथम कारवाई होणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog