कोलाड मध्ये ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगून किराणा व्यावसायिकांना ३३ हजार रुपयांचा गंडा

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन किराणा दुकानदारांनी सीसीटीव्ही बसविल्याने मुद्देमालासह गुन्हा उघडकीस

अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता!

रायगड (भिवा पवार) : कोलाड-खांब परिसरातील किराणा व्यावसायिकांना ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगून ३३ हजार रुपयांचा गंडा लावला असून याविषयी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन किराणा दुकानदार यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने गुन्हा उघडकीस आला असून आरोपींना  मुद्देमालासह  अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार दि. १९ जानेवारी २०२० रोजी  सायंकाळी ७ वाजता पुई पेट्रोल पंपासमोरील सुहास महादेव उरवणे यांच्या किराणा दुकानातुन १२,२०० किंमतीचा विलीना कंपनीचे ऑईल, तर दि.२० जानेवारी रोजी वरसगाव येथील मयुर सुहास गांधी यांच्या दुकानातीन १०,०८० रुपयाचा विनीला कंपनीचा सोयाबीन ऑईल, तर खांब येथील सतीश सखाराम मुसळे यांच्या दुकानातून ८,२५० रु. किंमतीचा जेमिनी व सम्राट कंपनीचा ऑईल एक जाडसर व एक  सडपातळ अशा दोन अज्ञात इसमांनी ऑनलाईन पेमेंट करुन खात्यात जमा करतो असे सांगून लंपास केला.
वरील सर्व रक्कम अज्ञात इसमाचा मोबाईल नं. ८८२८१२४७८२ या मोबाईल नंबरवरून बँक खात्यात जमा केली असे भासवून सुहास उरवणे यांच्या खात्यात १३,०००/- रु., मयूर गांधी यांच्या खात्यात ११०००/- रु. सतीश मुसळे यांच्या खात्यात ९,०००/- रु. जमा केले असे सांगून सुहास उरवणे यांच्याकडून ८००/-  रु, मयूर गांधी यांच्याकडून ९२०/- रु., तर सतीश मुसळे यांच्याकडून ७५०/- रु. रोख रक्कम घेण्यात आली. असे एकूण ३३ हजार रुपयांच्या मालाचा गंडा घालण्यात आला आहे.
याविषयी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४/२०२१, भा.दं.वि. कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा  नोंदविण्यात आला असून अधिक तपास कोलाड सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. एन.बैसाणे, एस.आर.माने हे करीत आहेत.

Popular posts from this blog