ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला कठोर शासन करावे 

दलित युथ पँथर संघटनेचे माणगांव पोलीसांना निवेदन 

इंदापूर (संतोष मोरे) : माणगांवमधील दत्तनगर येथील शिक्षक कॉलनीत राहणारा शिक्षक मदन प्रल्हाद वानखेडे या नराधमाने माणूसकीला काळीमा फासत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. यासंदर्भात माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी दलित युथ पँथर संघटनेतर्फे माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून सदर नराधम शिक्षकाला कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. 

याप्रसंगी विजय जाधव (कोकण प्रदेश अध्यक्ष), रोहित सकपाळ (रायगड जिल्हा महासचिव), प्रशांत पारधे (रायगड जिल्हा प्रवक्ते), रोहन शिर्के (माणगांव तालुका अध्यक्ष), सुशील कासारे (माणगांव तालुका महासचिव), राजेश  हाटे (रायगड जिल्हा संपर्क प्रमुख) आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog