www.news24taasmarathi.com पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... www.news24taasmarathi.com

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत आधिकारी यांचा ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार

माणगांव (राजन पाटील) : आजपर्यंत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर असणारे जून्या पेन्शनचे प्रणेत शिक्षक, सेना कोकण विभागाचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते लोकमान्य ज्ञानदिप विदयामंदिर साई हायस्कूलचे शिक्षक श्री. चंद्रकांत आधिकारी यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

जूनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने पेण येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात हा सत्कार करण्यात आल्याने सरकारने जरी जून्या पेन्शनचा हक्क नाकारला असला तरी आम्ही सर्व शिक्षक आदर्शवत काम करत असल्याचा संदेश सरकार दरबारी गेला. तर दुसऱ्या अर्थी एक आदर्श शिक्षक जूनी पेन्शन साठी झगडत आहे याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे, असे मत शिक्षक सेना कोकण विभागाचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केले. 

चंद्रकांत आधिकारी यांची शिक्षणातील उत्तम कामगिरी, सामाजिक कार्य, विद्यार्थी विकास, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे तसेच त्यांना विवीध सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, क्रीडा विभागातील उत्कृष्ठ कार्याबद्दल हा पुरस्कार मिळाल्याने या मेळाव्यात आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी संपूर्ण रायगडातून आलेल्या शिक्षक बंधू-भगिनींनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. चंद्रकांतआधिकारी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण तालुक्यातून त्यांचा अभिनंदन होत आहे. तसेच सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog