ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

महिला बचत गट सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील राहणार - सरपंच सौ. ज्योती पायगुडे

महिला बचत गटासाठी प्रशिक्षण वर्ग उत्साहात

तळा (संजय रिकामे) : शासकीय योजनांचा लाभ मिळाल्यास महिला बचत गट सक्षम होतील हा लाभ मिळावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन असे आश्वासन गिरणे ग्रामपंचायत सरपंच सौ. ज्योती कैलास पायगुडे यांनी दिले. गिरण येथील महिला बचत गट प्रशिक्षण वर्गात त्या बोलत होत्या.सौ. पायगुडे पुढे म्हणाल्या की महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय उभारत आहेत त्यातून त्यांचे सक्षमीकरण होत आहे या महिलांना बचत गटाचे प्रशिक्षण मिळाल्यास त्या अधिक सक्षम होतील. शासनाकडून मिळणारे प्रशिक्षण महिलांनी आवर्जून घेतले पाहिजे त्यातूनच व्यवसायाची दिशा मिळेल महिलांनी स्वतःच्या पायावर कसे उभे राहता येईल हे पाहिले पाहिजे असे सौ.पायगुडे यांनी सांगितले. 

गिरणे ग्राम पंचायत सरपंच ज्योती कैलास पायगुडे यांच्या प्रयत्नाने स्वदेस फाऊंडेशन व कृषी विभाग तळा यांच्या संयुक्त विद्यमाने गिरणे गाव व परिसरातील महीला बचत गटांना शेतीसंबंधी माहिती तसेच लघूउद्योग संबंधी मार्गदर्शन देण्यासाठी बचत गट प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गिरणे ग्राम पंचायतीच्या सरपंच सौ. ज्योती पायगुडे, कृषी विभागचे प्रताप कदम, सुमीत पूरी ग्रामसेवक खंडू काळे, गिरणे गाव विकास समितीचे अध्यक्ष  सुभाष  पाशिलकर, सचिव भगवान माळी, स्वदेस फाऊंडेशन चे कृषी विभागाचे संजय भौड, निनाद दर्गे, तळा टिमचे संतोष मोरे, स्वदेस समन्वयक बालाजी श्रिडोळे त्याचप्रमाणे गिरणे, गिरणे बौध्दवाडी नानवली, वाघवाडी येथिल ७ बचत गटातील ७० महिला या शिबिराला उपस्थित होत्या. 

या प्रशिक्षण शिबिरामध्ये कृषी विभागाचे प्रताप कदम यांनी शासकीय योजनांची माहिती दिली यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, भाऊसाहेब फुंदे फळबाग योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, लोकनेते गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या सर्व योजनांबाबत सविस्तर माहिती बचत गटातील महिलांना दिली. त्याचप्रमाणे स्वदेस फाऊंडेशनच्या कृषी विभाग चे निनाद दर्गे व संजय भौड यांनी  सेंन्द्रीय शेती, परसबाग लागवड, मिश्र पीक पध्दती, शेती पुरक व्यवसाय व यशस्वी बचत गटांची उदाहरणे व माहिती व्हिडिओ च्या माध्यमातून दिली.

Comments

Popular posts from this blog