🚨 पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... 🚨

माणगांव तालुक्यातील क्रिडा प्रेमी व क्रिडा शिक्षकांकडून तहसिलदार ललिता बाबर यांचे स्वागत व शुभेच्छा! 

इंदापूर (संतोष मोरे) : राज्यशासनाच्या क्रिडा कोट्यातून ऑलिंपीक धावपटू ललिता बाबर यांची रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे तहसिलदार पदावर नेमणूक करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर पासून त्यांचे विविध ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे. प्रत्यक्ष काम करण्यासाठी त्यांची येथे नेमणूक करण्यात आली आहे. येथील अनुभवानंतर प्रांताधिकारी पदावर त्यांची नेमणूक होणार आहे. 

अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ललिता बाबर यांचे स्वागत क्रिडा मार्गदर्शक संजय गमरे, क्रिडा शिक्षक विजय भामरे (निजामपूर), श्री. डांगे सर (गोरेगांव), नितीन उभारे (भाले, ता. माणगांव), श्री. चौधरी सर (गोरेगांव), श्री. चवरकर सर (एस.ए. निकम स्कूल, माणगांव), राष्ट्रीय खेळाडू रोहित पारधे आणि श्रेयस संजय गमरे, आर्यन गमरे, सौ. रतिका संजय गमरे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog