🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

वारक ग्रामपंचायत नवीन बांधकामाचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमीपुजन

सरपंच संगीता शेपुंडे यांच्या हस्ते पालकमंत्र्यांचे स्वागत

माणगांव (प्रमाेद जाधव) : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर आणि लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी विकासकामांचाी मंजुरी व उद्घाटनाचा धडका सुरु केला आहे. खासदार सुनिल तटकरे हे सत्ता असाे किंवा नसाे... विकासकामांच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर ठरले आहेत! ताेच आदर्श डाेळ्यासमाेर ठेवून पालकमंत्री आदीती तटकरे काम करत आहेत अशी चर्चा इंदापूर विभागातील नागरिकांमध्ये सुरु आहे. मागच्या आठवड्यात पालकमंत्र्यांनी माणगांव तालुक्याचा दाैरा केला, त्यामध्ये तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायत विभागातील विकासकामांचे भुमीपुजन करण्यात आले.

याच वेळी स्वयंभु गणपतीचे दर्शन घेऊन इंदापूर गणातील वारक ग्रामपंचायतीचा नवीन बांधकामाचे भुमीपूजन साेहळा २२ नाेव्हेंबर राेजी पार पडला. या कार्यक्रमावेळी मागील काही महिन्यांपूर्वी बिनविराेध निवड झालेल्या वारक ग्रामपंचायतीच्या सरपंचा संगिता शेपुंडे यांनी पालकमंत्र्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माणगांव तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, सरचिटणीस महादेव बक्कम, पंचायत समिती सभापती अलका जाधव, पं. स. सदस्य शैलेश भाेनकर, महिला तालुकाध्यक्षा संगिता बक्कम, सहादेव बक्कम, दिनेश वारेकर, प्रकाश धैंबेकर, विजय धसाडे, माणगांवच्या प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, ग्रामसेविका पालकर, कर्मचारी वृंद व सर्व ग्रामपंचायत सदस्य, बेंडखळे गुरुजी, वसंत साठे, विनायक सापळे, नागेश शेपुंडे, सुधीर सापळे, सुभाष उभारे, नारायण शेपुंडे, भागाेजी अर्बन, सदाशिव सालदुर, यशवंत काेदे, अनिल मानकर, अनंत विचारे, नथुराम विचारे, विठाेबा दळवी आदी ग्रामस्थ व अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पंचक्राेशीतील उपस्थित हाेते.

Comments

Popular posts from this blog