ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

अशोक दुधे रायगडचे नवे पोलीस अधीक्षक

अनिल पारस्कर यांची बदली 

अलिबाग : रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी रायगडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

शासनाच्या गृह विभागाकडून भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांची बदलीने पदस्थापना करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशानुसार रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी रायगडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog