माणगांवमधील वकील ॲड. केदार गांधी यांना कायद्याचे अपूरे ज्ञान! नोटीसमध्ये मिडीयाला म्हणाले सोशल मिडीया
रायगड (किशोर केणी) : 'मिडीया' आणि 'सोशल मिडीया' या दोन गोष्टींमधील फरक समजून घेण्यासाठी माणसाला थोडे तरी नॉलेज असणे गरजेचे आहे. माणगांव येथील कायद्याचे अपूरे ज्ञान असलेले वकील ॲड. केदार गांधी यांना तर 'मिडीया' आणि यूट्यूब 'सोशल नेटवर्कींग माध्यम' (सोशल मिडीया) यांतील फरकच कळत नसल्याचे त्यांनी स्वतःच पाठविलेल्या नोटीसद्वारे सिद्ध झालेले आहे.
'न्यूज 24 तास मराठी' वेब न्यूज हे भारत सरकारद्वारा नोंदणीकृत (नोंदणी क्र. MH27D0053921) अधिकृत मिडीया असून हे भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या कक्षेत कार्यरत आहे. यूट्यूब किंवा कोणत्याही सोशल मिडीयाशी 'न्यूज 24 तास मराठी' वेब न्यूजचा कोणताही संबंध नाही. प्रसारमाध्यमांसाठी सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन 'न्यूज 24 तास मराठी' मार्फत केले जात असते. सबळ पुराव्यांच्या आधारानेच यामध्ये बातम्या प्रसारित केल्या जात असतात. समोर जे सत्य दिसते ते प्रसारित करणे हे मिडीयाचे कर्तव्य आहे! त्यानुसारच निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाराम तुकाराम रणपिसे यांनी चुकीचे दाखले देऊन केलेले गैरप्रकार 'न्यूज 24 तास मराठी'च्या माध्यमातून उघडकीस आणल्यामुळे सरपंचांचे गैरकृत्य चव्हाट्यावर आलेले आहेत.
परंतु त्यानंतर माणगांवमधील ॲड. केदार गांधी यांनी न्यूज 24 तास मराठी' ला कायदेशीर कारवाईसंदर्भात नोटीस पाठवलीय. परंतु त्यामध्ये त्यांनी 'न्यूज 24 तास मराठी' वेब न्यूजला यूट्यूब व सोशल नेटवर्कींग माध्यम (सोशल मिडीया) असे संबोधून स्वतःचेच अज्ञान दाखवून दिले आहे. कारण 'न्यूज 24 तास मराठी' वेब न्यूज हे भारत सरकारद्वारा नोंदणीकृत मिडीया आहे. पण हे समजण्याइतके ज्ञान या अज्ञानी वकीलाला दिसत नाही. त्यामुळे या वकीलाने जर एखादी केस लढायला सुरूवात केली तर तो पुढे काय दिवे लावेल? हे यावरूनच स्पष्ट होत आहे. त्यामुळे या वकीलाने पाठविलेली नोटीस आता त्याच्यावरच पालथी पडण्याच्या मार्गावर असून या 'अज्ञानी' वकीलाचा समाचार घेण्यासाठी 'न्यूज 24 तास मराठी' वेब न्यूज सज्ज आहे.