ना. छगन भुजबळ तसेच खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसा निमित्त रोहा येथे होम क्वारंटाईनसाठी मोफत सुविधा


रायगड (भिवा पवार) : महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग मंत्री ना. छगन भुजबळ तसेच नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 1 ऑक्‍टोबर ते 15 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांसाठी होम क्वारंटाईन सुविधा मोफत केली जाणार आहे. 

रोहा तालुक्यातील धाटाव येथील सुप्रसिद्ध डॉक्टर राजू जाधव आणि डॉक्टर विद्या जाधव यांच्यामार्फत या सुविधा मोफत केल्या जाणार आहे. संबंधितांनी स्वराज क्लिनिक धाटाव, डॉ. राजू जाधव. मोबाईल नं. 9921741960 तसेच विरोज क्लिनिक रोहा. डॉ. विद्या जाधव. मोबाइल नं. 9921741961 येथे संपर्क साधावा. डॉ. राजू जाधव हे अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहेत. कोरोनाने अनेकांना मोठा धक्का दिला. अनेकांकडे औषधोपचारासाठी आर्थिक बळ नाही. या गोष्टीची जाणीव डॉ. राजू जाधव आणि डॉ. विद्या जाधव यांनी ठेवून मंत्री छगन भुजबळ तसेच खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनाबाधीत रुग्णांसाठी दि. 1 ऑक्‍टोबर ते 15 ऑक्टोबर 2020 या कालावधीसाठी मोफत होम क्वारंटाईन सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे डॉ. राजू जाधव यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog