ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

विळे परिसरात कोरोनाचा पहिला बळी


पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :

माणगांव तालुक्यातील विळे (भाऊंची आळी) येथील रहिवासी किशोर कांता पोळ (वय ५२) यांचा दि. २६ सप्टेंबर २०२० रोजी पनवेल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. किशोर पोळ गेली २० दिवस आजारी होते. कोरोनाची सर्व लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांना माणगांव येथे हलविण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना पनवेल येथे नेण्याचा सल्ला दिला व त्याप्रमाणे त्यांना पनवेल येथे नेल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. समाजातील चांगली प्रतिष्ठा व मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेल्या किशोर पोळ यांच्या आकस्मिक मृत्यूने विळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोमवार दि. ५ ऑक्टोबर २०२० रोजी दशक्रिया विधी व गुरुवार दि. ८ ऑक्टोबर २०२० रोजी तेरावे त्यांच्या राहत्या घरी होणार आहेत. थंडी, ताप, सर्दी, पडसे, अंग दुखी या पैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास ग्रामस्थांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे येथील स्थानिक डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Comments

Popular posts from this blog