🚨 रायगड पोलीस शिपाई भरती : १५ मार्चला अलिबागमध्ये लेखी परीक्षा... 🚨 रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमित; नागरिकांनी घाबरून जाऊ नये, साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलेंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर आवश्यक आहे – जिल्हाधिकारी किशन जावळे... 🚨

समाजसेवक रविंद्र मोरे यांची रायगड जिल्हा शांतता कमिटीवर निवड 


माणगांव (उत्तम तांबे) : माणगांव तालुका सुपूत्र, बौधजन पंचायत समिती माणगांव तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी असणारे, बहुजन समाजातील लोकप्रिय नेतृत्व रविंद्र भिकू मोरे यांची रायगड जिल्हा शांतता कमिटीवर निवड करण्यात आली आहे. 

सामाजिक बांधिलकी म्हणून गेली तीस वर्ष रविंद्र मोरे हे समाजकार्य करीत आहेत. या समाजसेवेमुळेच आज ते आनंदराज आंबेडकर (सभापती - बौ.पं.स. मुंबई) यांच्या नेतृत्वाखाली बौद्धजन पंचायत समिती या मातृसंस्थेच्या तालुका अध्यक्ष पदावर काम पहात आहेत. यापूर्वी माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली भिमशक्ती या सामाजिक संघटनेतून जिल्हा संघटकपदी राहून बहुजन समाजाला न्याय, हक्क देण्यासाठी तन-मन-धन अर्पून त्यांनी कार्य केले आहे. समाजामध्ये जातीच सलोखा राखण्यासाठी मोरे यांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे. शालेय व्यवस्थापन तसेच ग्रामस्वच्छता अभियानामध्ये हिरारीने सहभाग तसेच वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक कार्यक्रमासह समाजातील गोरगरीब गरजू विद्यार्थांना भरीव मदत केली आहे. तसेच माणगांव रिक्षा चालक-मालक संघटनेवर प्रमुख सल्लागार म्हणून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करून सहकार्य करीत आहेत. राहनीमान साधी आणि उच्च विचार त्यातच डॅशिंग नेतृत्वामुळे मोरे यांचा माणगांव तालुक्यात दरारा आहे. या नेतृत्वामुळे बाहुजन समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो. बहुजन समाजामध्ये होणारे वाद-विवाद स्थानिक पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था यांची सांगड घालून, आपल्या कुशल बुद्धीमतेने वाद मिटऊन समाजात सलोखा निर्माण करतात. अशा महत्त्वपूर्ण कार्याबद्द्ल तत्कालिन जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांच्या हस्ते मोरे यांना रायगड जिल्हा पोलिस दलातर्फे सन्मानपूर्वक अभारपत्रक देण्यास आलेले आहे . तसेच तत्कालिन पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे, उपविभागीय पो. अधिकारी अतुल झेंडे यांच्या हस्ते त्यांना मानपत्र बहाल झाले आहे. याबरोबर क्रांतीसुर्य, समाजसेवक असे विविध पुरस्कार मोरे यांना प्राप्त झाले आहेत. 

रविंद्र मोरे यांच्या कार्याची खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री - आदितीताई तटकरे यांनी दखल घेतल्यामुळे रविंद्र मोरे यांची रायगड जिल्हा शांतता कमिटीवर नेमणूक करण्यात आली आहे. विविध संस्था, संघटना यांच्याकडून रविंद्र मोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून बौद्धजन पंचायत समितीचे माजी तालुका सरचिटणीस पराग जाधव, शाखा क्र. ६ चे अध्यक्ष निलेश साळवी, सचिव अरविंद मोरे, शाखा क्र.१ चे सचिव विनोद मोरे, शाखा क्र. ५ चे अध्यक्ष विवेक जाधव, समाजसेवक दिपक शिलीमकर, अॅड. नरेश जाधव, रणजित मोहिते, प्रकाश मोरे, प्रमोद हाटे या मान्यवरांनी मोरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे गौरवशाली अभिनंदन करून पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog